शिवाजी महाराज निबंध मराठी Shivaji Maharaj Essay in Marathi

Shivaji Maharaj Essay in Marathi – Shivaji Maharaj Nibandh Marathi शिवाजी महाराज निबंध मराठी मित्रांनो, आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापन करणारे एक कर्तृत्ववान युगपुरुष होते. शून्यातून निर्माण केलेले हे स्वराज्य त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या बुद्धी चातुर्यावर उभे केले आहे. शिवाय, शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापन करून त्याचा कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत.

shivaji maharaj essay in marathi
shivaji maharaj essay in marathi

शिवाजी महाराज निबंध मराठी – Shivaji Maharaj Essay in Marathi

Shivaji Maharaj Nibandh Marathi

जन्म आणि बालपण

जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जिजाऊंच्या पोटी दिनांक १९ फेब्रुवारी १६३० रोजी फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाई देवीच्या नावाने राजांचे नाव “शिवाजी” असे ठेवण्यात आले. वडिलांचे नाव शहाजी भोसले आणि आईचे नाव जिजाबाई भोसले होते. त्यांचे वडील म्हणजेच शहाजीराजे भोसले हे सरदार म्हणून कार्यरत होते.

शिवाजी महाराजांची बालपणाची सगळी वर्ष ही घोडेस्वारी, गनिमी कावा राज्यकारभार आणि युद्धकला शिकण्यात गेली. त्यांची आई म्हणजेच जिजाऊ शिवरायांना लहानपणी रामायण, महाभारत, तसेच इतर महापुरुषांच्या कथा सांगत असतं. ह्या सगळ्या कथा ऐकून त्यांना स्वराज्य स्थापन करायला प्रोत्साहन मिळाले.

त्यामुळे, लहानपणीच त्यांच्या अंगी पराक्रम, प्रजादक्षता हे गुण बाणवले गेले. त्यांचे वडील त्यांना वेळ मिळेल तेंव्हा त्यांना युद्धकला आणि  घोडेबाजी शिकवत असतं. याखेरीज, दादोजी कोंडदेव ह्यांनी शिवाजी महाराजांना युध्यकौशल्य आणि नीतिशास्त्र शिकवले.

पूर्वी लग्न ही न कळत्या वयातच होत होती. त्यामुळे, शिवाजी महाराज यांचे लग्न सुद्धा किशोर वयातच झाले. निंबाळकर घराण्यातील “जिऊबाई ” ही महाराजांची पहिली राणी होती. तिचे सासरचे नाव “सईबाई” असे ठेवण्यात आले होते. मुघली सत्तांचा रयतेवर होणारा अन्याय त्यांच्या दृष्टीस येत होता,  म्हणून त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.

आयुष्यातील महत्वपूर्ण प्रसंग

निश्चयाचा महामेरू…बहुतजनांसी आधारु…. अखंडस्थितीचा निर्धारु…असा श्रीमंत योगी रयतेचा जाणता राजा म्हणजे शिवाजी राजा होय. मित्रांनो, त्याकाळी गोवळकोंड्याला कुतुब शहा, उत्तरेला शहाजहान आणि विजापूरला आदिलशाह ह्यांची सत्ता होती. शिवाय, पोर्तुगीजांनी सगळे समुद्रकिनारे ताब्यात घेतले होते. शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले हे मुघलांच्या चाकरीत सामील होते.

ते आदिलशहाच्या चाकरीत उच्च पदावर कार्यरत होते. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी महाराजांनी तोरणा, चाकण आणि कोंढाणा हे किल्ले ताब्यात घेतले. तोरणा हा पहिला किल्ला त्यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. नंतर त्यांनी ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथील किल्ल्यांवर ताबा मिळवला.

त्यामुळे, इकडे महाराजांना लगाम लावण्याकरता त्यांच्या वडिलांना बंदी करण्यात आले. त्यामुळे, पुढची ७ वर्षे  राजांनी आदिलशहावर थेट आक्रमण केले नाही. शिवाजी महाराजांच्या इतिहासानुसार राजांनी ३०० हून अधिक किल्ले जिंकले आहेत. यांतील, शिवनेरी, प्रतापगड, सिंधुदुर्ग, रायगड, विजयदुर्ग, तोरणा, पन्हाळा, सिंहगड आणि प्रबळगड असे असंख्य किल्ले जिंकून महाराजांनी स्वराज्य स्थापन केले.

प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आदिलशहाला काही केल्या महाराज हाती येत नव्हते. त्यामुळे, दरबारात शिवाजी महाराजांना कोण पडकुन आणेल, त्याला मोठा नजराणा देण्यात येईल असा सवाल करण्यात आला. अफजलखानाने महाराजांना पकडुन आणायचा विडा उचलला.

मित्रांनो, अफजलखान हा भरभक्कम खांदा असलेला, उंचबांधा असलेला आणि युद्ध कौशल्य असलेला सरदार होता. तरीदेखील, शिवाजी महाराजांनी त्याला गनिमी काव्याने भुईसपाट करून टाकले. शिवाय, लाल किल्ल्यावर तर शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली होती आणि या सगळ्या प्रसंगात शाहिस्तेखान एवढा भयभीत झाला होता की दुसऱ्या दिवशीच तो औरंगाबादला पळून गेला.

याखेरीज मित्रहो, शिवाजी महाराजांच्या शूरसैनिकांपैकी तानाजी मालुसरे हा एक विश्वासू आणि होतकरू असा मावळा होता. कोंढाणा किल्ला जिंकून आणण्यासाठी जीवाची बाजी लावायला अनेक शूरवीर तयार होते, पण महाराजांच्या मनात एकच वीराचे नाव आले ते म्हणजे ‘तानाजी मालुसरे‘, कारण  महाराजांच्या प्रत्येक संकटकाळात तानाजी मालुसरे यांनी मोलाची साथ दिली होती.

त्यामुळे, कोंढाणा किल्ल्यावर आक्रमण करताना तानाजीने शिवाजी महाराजांना जे वाक्य म्हटले होते, ते त्यांनी खरे देखील करून दाखवले. ते वाक्य पुढीलप्रमाणे…

   ” आधी लगीन कोंढाण्याचे

   मग माझ्या रायबाचे!”

कोंढाणा किल्ला जिंकला पण, सिंहासारखा तानाजी मात्र कायमचा गेला. म्हणूनच, त्यावेळी “गड आला पण, सिंह गेला” असे गौरवोद्गार महाराजांच्या तोंडातून निघाले आणि राजांना अश्रू अनावर झाले. खरंतर, तेंव्हापासून महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवले. अजूनही कोंढाणा उर्फ सिंहगड किल्ला हा तानाजी मालुसरे आणि त्यांच्या साथीदारांच्या शौर्याच्या पाऊलखुणा कणाकणात साठवून, आपल्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

खरंच, धन्य ते तानाजी आणि धन्य त्यांचा पराक्रम!

राज्याभिषेक

मित्रांनो, दिनांक ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अतिउत्साहामध्ये रायगड किल्ल्यावर पार पडला.  शिवराज्याभिषेकावेळी गागाभट्टाना ७००० होन तर, इतर सर्व ब्राम्हणांना १७००० होन दक्षिणा दिली गेली. शिवराज्याभिषेकाला रायगडावर खूप गर्दी झाली होती. राज्याभिषेकावेळी प्रजेने राजांना भरभरून आशीर्वाद दिले.

“शिवराय की जय”, “शिवराय की जय” अशा घोषणा मोठमोठ्याने देण्यात आल्या. सुरांच्या घोषात सगळा आसमंत भरून गेला. संपूर्ण रायगड आनंदाने नाचू गाऊ लागला. सर्व मंत्री सिहांसनापुढे जाऊन राजांना अभिवादन करू लागले. धन, घोडे, शस्त्रे यांचे दान करण्यात आले. रायगडावर राजांची मिरवणूक जात असताना प्रजेने राजांवर फुल उधळली आणि दिवे देखील ओवाळले.

राज्याभिषेकानंतरच्या मोहिमा

महाराजांनी जंजिऱ्याचे सिद्धी आणि इंग्रज या दोहोंवर दडपण आणले आणि विजापूरवर आक्रमण केले. या स्वारीत शिवाजी राजांनी सुपे, अकोला आणि  कारवारपर्यंत आपली हद्द कायम केली. इसवी सन  १६७४ ते १६७५ या काळात राजेंनी खानदेशवर चढाई केली.

शिवाय, विजापूर राज्यातील अथणी आणि संपगाव इथेदेखील आक्रमणे केली आणि मे १६७५ मध्ये त्यांनी आदिलशाहीकडून फोंड्याचा किल्ला ताब्यात घेतला. जानेवारी – फेब्रुवारी १६७६ दरम्यान महाराज सातारला आजारी होते, त्यासंबधी अनेक अफवा चहूबाजूंनी प्रस्तुत झाल्या.

त्यावेळी सुद्धा महाराजांनी ती परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली. शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांना त्यांच्या कृतीचा पश्चाताप झाल्यावर, जेंव्हा ते दिलेरखानाची छावणी सोडून महाराजांना शरण आले तेंव्हा, राजांनी पालकरांचे शुध्दीकरण करून त्यांना हिंदू धर्मात येण्यासाठी परवानगी दिली.

राजमुद्रा

मित्रांनो, जेंव्हा शिवाजी महाराज पुण्याचा कारभार पाहू लागले, तेंव्हा शहाजी राजांनी त्यांना स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली आणि ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.

           “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।

            शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।”

खरंतर, ह्याचा मराठीतून अर्थ असा आहे की, चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शाहजीचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढवत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोककल्याणासाठीच चमकेल.

शिवाजी महाराजांच्या पत्नी

शिवाजी महाराजांना एकूण आठ राण्या होत्या. सईबाई ही त्यांची पहिली पत्नी. सईबाईंचा मुलगा संभाजी हा होता. त्यांनतर, सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, सकवारबाई गायकवाड, काशीबाई जाधव, सगुणाबाई शिंदे, गुणवंताबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई विचारे अशा त्यांच्या सगळ्या मिळून आठ राण्या होत्या. यांतील इसवी सन १६५९ मध्ये सईबाई यांचे निधन झाले.

राज्यविस्तार

शिवाजी महाराजांनी कधी जातिभेद केला नाही. त्यांनी सगळ्या जातींच्या लोकांना मावळा असे नाव देऊन संघटित केले आणि त्यांच्याशी बोलून आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करून त्या प्रदेशाची माहिती घेतली. शिवाय, तरुणांना एकत्र आणून किल्ले बांधले. त्यादरम्यान आदिलशाहा आजारी पडला ह्या संधीचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूरमध्ये प्रवेश घेतला.

तेथील आजूबाजूचे सगळे किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. महाराज चाकण ते निरा प्रदेशाचे अधिपती झाले. कोकणसह एकूण नऊ किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. महाराजांनी स्वराज्याचा कारभार अगदी गनिमी काव्याने सांभाळला. त्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अपार कष्ट घेतले. शिवाय, शिवाजी महाराज येतील त्या संकटाना अगदी न घाबरता सामोरे गेले.

महाराजांचा मृत्यू

मित्रांनो, हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाराज तापाने आजारी पडले आणि दिनांक ३ एप्रिल  १६८० च्या सुमारास आपल्या लाडक्या राजाची प्राणज्योत मावळली. अखेर, आपल्यातून आपले छत्रपती शिवाजी महाराज कायमचे निघून गेले.

आम्ही दिलेल्या shivaji maharaj essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शिवाजी महाराज निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shivaji maharaj information in marathi essay या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chhatrapati shivaji maharaj essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chatrapati shivaji maharaj nibandh in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “शिवाजी महाराज निबंध मराठी Shivaji Maharaj Essay in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!