शिवजयंती निबंध मराठी Shivjayanti Essay In Marathi

Shivjayanti Essay In Marathi – Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Nibandh in marathi शिवजयंती निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती या विषयावर निबंध लिहिणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कोणाला माहित नाही असे नाही छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांनाच परिचित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व पराक्रम तसेच त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेली जिद्द आणि स्वराज्य स्थापनेसाठी केलेले कष्ट हे सर्वांना माहित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी आपल्या साम्राज्याला स्वराज्य असे देखील नाव दिले होते.

Shivjayanti Essay In Marathi
Shivjayanti Essay In Marathi

शिवजयंती निबंध मराठी – Shivjayanti Essay In Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Nibandh in marathi

महाराजांना स्वराज्याचं धनी म्हणून देखील ओळखले जात होते. आणि अश्या या आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव किंवा त्यांचा जन्म दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराज जयंती हि महाराजांच्या जन्माच्या दिवशी साजरी केली जाते आणि हि जयंती महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या थाटामाटात आणि एक मोठा सण किंवा उत्सव म्हणून साजरी केली जाते. ज्यावेळी जिजाबाई गरोदर होत्या त्यावेळी जिजाबाईंच्या सुरक्षेसाठी त्यांना शिवनेरी गडावर ठेवण्यात आले होते.

जिजाबाई शिवनेरी गडावर राहत असताना त्यांनी तेथील शिवाई देवीच्या मंदिरा मध्ये एक नवस मागितला तो नवस असा होता कि जर मला पुत्ररत्न झाले तर मी त्याचे नाव तुझ्या नावावरून ठेवीन आणि तसेच झाले जिजाबाईंनी पुत्ररत्न झाला आणि त्यांनी बाळाचे नाव शिवाजी ठेवले. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला.

दर वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती हि महाराष्ट्रामध्ये तसेच कर्नाटकातल्या काही सीमा भागामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती हि साजरी केली जातेच पण ज्या ठिकाणी म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करू आपले वेगळे राज्य स्थापन केले तसेच सदैव धर्माचा आणि आपल्या प्रजेच विचार केला त्यामुळे त्यांना आजही लोक महान मानतात तसेच त्यांना आजही आदर दिला जातो तसेच महाराष्ट्रामध्ये तर शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानले जाते.

महाराजांनी खुप लहान वयामध्ये तोरणा हा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची स्थापना केली तसेच त्यांनी आपले स्वराज्य मोठे करण्यासाठी स्वराज्यामध्ये अनेक किल्ले आणले जसे कि रायगड, राजगड, प्रतापगड, पुरंदर, विशाळगड, पन्हाळगड, सिंहगड, अजिंक्यतारा, लोहगड अश्या प्रकारे अनेक किल्ले त्यांनी जिंकले आणि स्वराज्याचा विस्तार त्यांनी वाढवला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांचा जयजयकार होतो आणि लोक त्यांना खूप मानतात.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महारांजांचा जन्मोत्सव अगदी जल्लोश्यामध्ये साजरा केला जातो कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा जन्मोत्सव साजरा करावा असा पराक्रम केला होता आणि म्हणून हा साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगड / रायरी या किल्ल्यावर महात्मा जोतीबा फुले यांची शोधून काढली आणि मग त्यानंतर फुलेंनी इ.स १८७० मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक शिव जयंती पुणे शहरामध्ये केली मग ती परंपरा लोकमान्य ठीळक यांनी चालू ठेवली.

महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते तसेच शिवनेरी आणि रायगड या किल्ल्यावर तर शिवजयंती अगदि विशेष असते आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती अगदी थाटामाटात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज हि जयंती हि वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते जसे कि काही ठिकाणी शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती पुजली जाते तसेच मानवंदना आणि घोषणा दिल्या जातात त्याचबरोबर शिवजयंती दिवशी मिरवणूक काढली जाते.

तसेच काही मंडळे या दिवशी अन्न दान ( प्रसाद ) करतात. तसेच झांजपथक तसेच ढोल यासारख्या पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढली जाते तसेच त्यांना मानवंदना दिली जाते. काही जन त्यांच्या कले मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित काही नाटक तसेच अनेक वेगवेगळे पोवाडे साधार करून महाराज्यांच्या विषयी लोकांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या विषयी आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी काही महाराज प्रेमी किंवा दुर्ग प्रेमी महाराजांच्या गडाला भेट देवून मानवंदना देतात किंवा शिवजयंती साजरी करतात. तसेच काहीजण शिव जन्मोत्सव सोहळा, तसेच काही जन हातामध्ये भगवे झेंडे घेवून दुचावरून रॅली काढतात तसेच शिव जन्मोत्सव सोहळा आणि शिव ज्योत दौड या सारखे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करून शिव जयंती साजरी केली जाते.

शिव जयंती सोहळा हा मोठ मोठी मंडळ साजरे करतात जसे कि आपण गणेश चतुर्थी ला जसे कि आपण गणेश चतुर्थीला जशी जय्यत तयारी करतो म्हणजे मंडप घालतो तसेच मंडप शिव जयंतीला देखील घातले जातात तसेच स्टेज बनवून ते फुलांनी सजवले जाते. काही मांडले शिवज्योत दौड काढतात आणि मग ते शिवाजी महाराजांच्या मोठ्या मूर्तीची ढोल ताशे किंवा झांजपथकच्या गजरामध्ये मिरवणूक काढण ते मंडपापर्यंत नेतात आणि मग तिथे शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाते आणि मग त्या मूर्तीची पूजा केली जाते त्याला हार फुले घातली जातात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाते.

“प्रौढ प्रताप पुरंदर

क्षत्रियकुलावतंस्

सिंहासनाधीश्वर

महाराजाधिराज

योगीराज

श्रीमंत

श्री श्री श्री

छत्रपती शिवाजी महाराज कि जय”

तसेच काही मंडळे शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर नाटक दाखवण्याचे किंवा पोवाडे सादर करण्याचे प्रयत्न करतात आणि महाराजांचे अनेक शूर वीरतेचे पराक्रम लोकांच्या समोर दाखवण्याचे प्रयत्न करतात. तसेच काही मंडळे छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी अन्न दान ( प्रसाद ) करतात. अश्या प्रकारे छत्रपती शिवाज महाराजांना वेगवेगळ्या प्रकारे मानवंदना देवून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो.

त्याच बरोबर सध्या लोक सोशल मिडिया वरून वेगवेगळ्या प्रकारे शिव जयंतीच्या शुभेच्छा देतात आणि आणि अश्या प्रकारे म्ह्राष्ट्रामध्ये आणि कर्नाटकच्या काही सीमा भागामध्ये देखील अगदी थाटामाटात आणि अगदी आनंदामध्ये शिवजयंती साजरी केली जाते.

आम्ही दिलेल्या Shivjayanti Essay In Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शिवजयंती निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि shivaji jayanti essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!