Eat Healthy Stay Fit Essay in Marathi हेल्दी खा निरोगी रहा निबंध आज आपण या लेखामध्ये चांगले हेल्दी फूड खाऊन आपली तब्येत कशी चांगली ठेवायची या विषयावर लिहिणार आहोत. बघायला गेले तर आपण जितके पौष्टिक आणि आपल्याला त्या आहारापासून उर्जा मिळेल असे अन्न खाऊ तितकी आपली तब्येत चांगली राहण्यासाठी मदत होते. असे अनेक पदार्थ असतात जे पौष्टिक घटकांनी भरलेले असतात आणि असे अनेक पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे आपले बरेचसे आजार कमी होतात. सध्या पहिले तर लोकांचे जीवन हे खूप दगदगीचे झाले आहे आणि त्यांना कामाच्या गडबडीमुळे व्यायाम करायला मिळत नाही तसेच गडबडीमध्ये नाश्ता करून जावा लागतो.
तसेच त्यांना कामाच्या गडबडीमध्ये जेवणाचे भान राहत नाही तसेच पौष्टिक आहार देखील ज्यांना खायला मिळत नाही आणि त्यामुळे अनेक लोकांची तब्येत आणि आरोग्य बिघडते तसेच लोक आजारी पडतात. तसेच सध्या अचानक बदलत असलेल्या वातावरणामुळे देखील अनेक लोकांची तब्येत बिघडत आहे आणि लोक आजारी पडत आहेत.
पण लोकांनी या सर्व गोष्टींच्यावर मात करण्यासाठी आणि आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्या पौष्टिक पूरक आणि चांगल्या प्रकारचा आहार घेणे खूप महत्वाचे आहे कारण पौष्टिक आहार खाल्ल्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते आणि आपली चांगली प्रतिकार शक्ती आपल्याला कोणत्याही आजारापासून लांब ठेवते आणि म्हणूनच म्हणतात कि eat healthy and stay fit.
पौष्टिक खा निरोगी रहा निबंध – Eat Healthy Stay Fit Essay in Marathi
आपण रोजच्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पौष्टिक अन्न खाल्ले पाहिजे आणि आपल्या नाश्त्याची वेळ, दुपारची वेळ आणि संध्याकाळची वेळ ठरवली पाहिजे तसेच आपण आहारामध्ये जितके पौष्टिक अन्न खावू शकतो तितके खाल्ले पाहिजे. आपण जर मोठ्या प्रमाणात पौष्टिक आहार, वेगवेगळ्या प्रकारची फळे, अंडी, दुध यासारखे पदार्थ समाविष्ट केले तर आपले आरोग्य नक्कीच चांगले राहील आणि त्यामुळे आपण सारखे सारखे आजारी पडणार नाही आणि चांगले आणि पौष्टिक खाल्ल्यामुळे अपने आरोग्य चांगले राहील.
जर आपल्याला आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपल्याला काही गोष्टी करणे किंवा खाणे टाळले पाहिजे जसे कि आपण बाहेरचे बर्गर, फ्रेंच फ्राईज, बटाट चिप्स, पिझ्झा यासारखे जंक फूड खाणे कमी केले पाहिजे तसेच आहारातील मीठ आणि साखर यांचे प्रमाण कमी केले पाहिजे. आपण जर रोजच्या आहारामध्ये फळे समाविष्ट केली तर आपल्याला अनेक आरोग्य फायदे होतात कारण फळांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात.
सफरचंद फळ रोज खाऊ शकतो आणि या फळावर एक प्रसिद्ध म्हण म्हणजे ‘एक सफरचंद एक दिवस डॉक्टरांना दूर ठेवतो’ (an apple a day keeps doctor away). सफरचंद फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द असतात, या सर्वांचा आरोग्यास फायदा होतो तसेच सफरचंद हे अँटीऑक्सिडंट्सचे विश्वसनीय स्रोत आहे. अननस या फळामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे जर आपण अननस खाल्ले तर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्यामुळे आपण कोणत्याही आजारापासून दूर ठेवते तसेच अननस खाल्ल्यामुळे सांधेदुखी तसेच कर्क रोगाचा धोका कमी होतो.
किवी हे फळ देखील आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्तम फळ आहे आणि हे फळ देखील इतर फळांच्यासारखे अनेक पोषक घटक प्रधान करते. व्हिटॅमिन सीच्या उच्च सामग्रीमुळे किवीला आरोग्यदायी अन्न म्हणून प्रतिष्ठा मिळाली आहे, परंतु फळ इतर पोषक घटकांमध्ये देखील समृद्ध आहे. हे रक्तदाब कमी करण्यास, जखमा बरे करण्यास, आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करू शकतात. केळ हे फळ देखील आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या ठरू शकते, कारण त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात आणि म्हणूनच केल्याला पोषक घटकांचे पॉवर हाऊस असे म्हंटले जाते.
आणि केळ या फळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी – ६ आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्त्रोत त्याचबरोबर ते फायबर देखील प्रदान करतात आणि यामध्ये चरबी, कोलेस्टेरॉलमुक्त आणि सोडियम कमी असते त्यामुळे केळ या फळाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. त्याचबरोबर फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा देखील आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि आंबे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चे समृद्ध स्त्रोत आहेत, जे आपल्या डोळ्यांसाठी आणि आरोग्यासाठी चांगले आहेत.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन ई, जस्त, लोह आणि कॅल्शियम देखील भरपूर असते. व्हिटॅमिन ई आपल्या त्वचेसाठी देखील चांगले आहे आणि कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात. डाळिंब हे फळ देखील आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकते कारण यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के यासारखे पोषक गुंधाराम असतात तसेच चिकू, मोसंबी, संत्री, कलिंगड, द्राक्षे या फळांच्या मध्ये देखील पोषक घटक असतात आणि अश्या प्रकारे प्रत्येक फळामध्ये काही ना काही पौष्टिक गुणधर्म असतोच.
त्याचबरोबर आपण जर बदाम, काजू, बेदाणे, अक्रोड, पिस्ता, काळे बेदाणे, अंजीर, खजूर यासारखा सुख मेवा खाल्ला तर त्यातून देखील अनेक पोषक घटक मिळतात. पोषक घटक घटक म्हटले कि सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात त्या पाले भाज्या आणि फळ भाज्या. आपण आपल्या आहारामध्ये कोणती ना कोणती पालेभाजी समाविष्ट केली पाहिजे आपल्या आहारामध्ये मेथी, पोकळा, पालक असारख्या पौष्टिक पाले भाज्या असणे खूप गरजेचे असते.
तसेच जर आपण रोजच्या दिवसाची सुरुवात सलाड चा नाश्ता करून केली तर खूप चांगली होईल. सलाड मध्ये आपण गाजर, टोमॅटो, काकडी, बीट या सारख्या फळभाज्या घालून सलाड बनवून खाल्ले तर ते अगदी उत्तम होईल आणि त्याचे काही दुष्परिणामा देखील होणार नाहीत तसेच आहारामध्ये पदार्थ म्हटले तर असे अनेक पदार्थ आहेत.
जे खाल्ल्यामुळे आपल्याला पौष्टिक घटक मिळतात. अश्या प्रकारे आपण फळांच्या मधून तसेच पालेभाजांच्या पासून आपल्याला अनेक पोषक घटक मिळतात आणि त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते त्यामुळे जर आपण डॉक्टरला विचारून डायट प्लॅन घेऊन आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी लागणाऱ्या आहाराचा समाविष्ट तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये करू शकता.
सध्या आपले आरोग्य चांगले राखणे हि काळाची गरज बनली आहे त्यामुळे आपण व्यायाम आणि इतर गोष्टी करून आपले आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न तर नेहमीच करत असतो पण आपण आपल्या आहारामध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समाविष्ट करून आपली तब्येत आणि आरोग्य चांगले ठेवू शकतो.
आम्ही दिलेल्या eat healthy stay fit essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पौष्टिक खा निरोगी रहा निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या eat healthy stay fit essay in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of eat healthy stay fit in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट