जीवनात खेळाचे महत्व निबंध Essay on Sports in Marathi

Essay on Sports in Marathi जीवनात खेळाचे महत्व निबंध आज आपण खेळ या विषयावर (essay on sports) निबंध लिहिणार आहोत. आज आपण खेळ काय आहे त्याच्या फायदे काय आहेत तसेच आपण कोणकोणते खेळ खेळू शकतो आणि एकूणच आपल्या मानवी जीवनामध्ये खेळाचे महत्व काय आहे या सर्व विषयाबद्दल निबंधांमार्फत आज आपण माहिती घेवूयात. खेळ हा आपल्या जीवनातील एक महत्वाचा भाग आहे कारण खेळ खेळल्यामुळे आपले मनोरंजन तर होतेच परंतु अनेक प्रकारचे खेळ खेळल्यामुळे आपले आरोग्य आणि स्वास्थ्य देखील चांगले राहते.

खेळ हा शब्द कोणाच्या ओळखीचा नाही हा सर्वांच्या ओळखीचा आहे. कारण लहानपणी पासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत होतो. लहान असताना आपण लपंडाव, विठी दांडू, आट्या पाट्या, गोट्यांचा खेळ, लगोरी, फिंगरी यासारखे अनेक खेळ आपण लहान असताना खेळत होतो तसेच जस जसे शाळेमध्ये जवूल लागलो तसेच क्रिकेट, कब्बडी आणि खो खो यासारखे खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि हे शाळेतील प्रत्येकाचे ठरलेले खेळ असतात.

essay on sports in marathi
essay on sports in marathi

जीवनात खेळाचे महत्व निबंध – Essay on Sports in Marathi

Essay On Importance of Sports in Marathi

लहानपणी जे आपण खेळ खेळायचो ते फक्त आपल्या मनोरंजनासाठी असचे त्यामधून आपल्याला कोणताही आरोग्य फायदा होत नाही पण सध्या जे खेळ खेळले जातात जसे कि कब्बडी, क्रिकेट, खो खो या मध्ये आपल्या शरीराचा व्यायाम होतो. जसे कि खो खो खेळताना आपल्याला पाळावे लागते त्यामुळे पळून आपला चांगला व्यायाम होतो तसेच पाळल्या नंतर आपले रक्ताभिसरण देखील चांगले होते, तसेच क्रिकेट खेळताना बॅटणे बॉलला मारायचे असते त्यामुळे या खेळामध्ये आपल्या हाताचा व्यायाम होते.

अशा प्रकारे प्रत्येक खेळामध्ये कोणता ना कोणता तरी व्यायाम हा होऊन जातोच. पूर्वी तितकेच जेमतेम खेळ खेळले जायचे जसे परंतु सध्याच्या जगामध्ये अनेक खेळ उदयाला आले आहेत आणि खेळांच्या मध्ये खूप स्पर्धा वाढलेली आहे. खेळ हि एक शारीरिक क्रिया आहे आणि हि क्रिया खेळाच्या प्रकारावरून बदलत असते.

खेळाचे महत्व हे आपल्या सर्वांना माहित आहेच आणि कोणता ना कोणता तरी खेळ आपण सर्वांनी खेळला आहे आणि तसे बघायला गेले तर कोणताही खेळ खेळायला मुलांना किंवा मुलींना आवडतो. पूर्वी मुलींचे खेळ आणि मुलांचे खेळ असे वर्गीकरण केले होते त्यामध्ये मुलींचा खेळ म्हणजे लगडी, दोरी उडी, जिबली, सागरगोटे, लगोरी, लपंडाव यासारखे अनेक खेळ मुली खेळत होत्या आणि खो खो, कब्बडी, आट्या पाट्या, गोट्यांचा खेळ, विठी दांडू यासारखे मुले खेळतात.

पण सध्या आधुनिक काळामध्ये मुलांचा आणि मुलींचा असे खेळ विभागलेले नाहीत तर जे खेळ मुले खेळतात ते खेळ मुली देखील खेळतात कारण सध्या मुली देखील कश्यामध्ये पाठीमागे नाही आहेत आणि पूर्वी आपले मनोरंजन व्हावे म्हणून खेळ खेळले जायचे परंतु सध्या खेळांना स्पर्धात्मक स्वरूप आले आहे आणि हे खेळ जागतिक पातळीवर खेळले जातात.

खेळाचे दोन प्रकारे विभाजन केले आहे एक म्हणजे बैठा खेळ ( indoors games ) आणि मैदानी खेळ ( outdoors games ) अशे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. बैठे खेळ म्हणजे जो आपण बसून खेळू शकतो किंवा मग चार भिंतीच्या आत जो खेळ खेळला जातो त्याला बैठा खेळ म्हणून ओळखले जाते.

बैठ्या खेळामध्ये कॅरम, बुद्धीबळ, टेबल टेनिस, संगीत खुर्ची, बोर्ड गेम्स यासारखे अनेक खेळ चार भिंतींच्या आतमध्ये खेळले जातात. त्याचबरोबर मैदानी खेळांच्या विषयी जर सांगायचे म्हटले तर मैदानी खेळ खुल्या मैदानावर खेळले जातात आणि हे मैदान खूप मोठे असते आणि मैदानी खेळ म्हटले तर क्रिकेट, खो खो, कब्बडी, पोलो गेम, सायकलिंग, फुटबॉल, हॉकी, गोल्फ, बॅडमिंग्टन यासारखे अनेक मैदानी खेळ खेळले जातात.

खेळ म्हंटले कि आपल्या डोळ्यासमोर येते ती स्पर्धा आणि वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धेमधूनच समजते कि कोणता खेळाडू एका विशिष्ठ खेळासाठी सर्वोत्कृष्ट आहे. आपल्या भारतामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यातूनच वेगवेगळ्या उत्कृष्ट खेळाडूंची ओळख देशाला होते तसेच जगभरामध्ये देखील असे किती तरी खेळाडू असतात आणि आणि त्यांची सर्वोत्कृष्टता साऱ्या जगाला कळण्यासाठी आणि त्यांची ओळख साऱ्या जगामध्ये होण्यासाठी विविध खेळांचे आयोजन जागतिक पातळीवरती केले जाते.

जागतिक पातळीवर ज्या स्पर्धा अयोजित केल्या जातात त्या स्पर्धांना ‘ऑलंम्पिक स्पर्धा’ म्हणतात आणि या ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये अनेक वेगवेगळे खेळ खेळले जातात जसे कि बॅडमिंटन, सॉफ्टबॉल, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, बेसबॉल, सायकलिंग, बास्केटबॉल, हॉकी, नेमबाजी, स्विमिंग, कुस्ती, टेनिस, सर्फिंग, क्रिकेट, धावणे, गोळा फेक आणि थाळी फेक हे काही खेळ आहेत जे ऑलंम्पिक मध्ये खेळले जतात आणि ऑलंम्पिक मध्ये जो सर्वोत्तम खेळाडू ठरतो त्याचे जगभर नाव होते.

अशा प्रकारे खेळाचे महत्व आधुनिक जगामध्ये वाढले आहे. तसेच भारतामध्ये अनेक खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्या म्हणजे प्रो कब्बडी, आय. पी. एल, या सारख्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. जगामध्ये तसेच भारतामध्ये स्पर्धात्मक खेळ खेळले जाते असले तरी अनेक असे लोक असतात जे अनेक प्रकारचे खेळ आपल एक छंद म्हणून खेळतात किंवा मनोरंजन म्हणून खेळतात तसेच काहीजण त्यांना एखादा खेळ आवडतो म्हणून खेळ खेळतात.

खेळ खेळणे हे आपल्या आरोग्यासाठी कारण कोणताही खेळ खेळला कि मन अगदी ताजेतवाने राहते तसेच खेळ खेळल्यामुळे आपण जास्त आजारी पडत नाही. त्यामुळे जीवनामध्ये खेळला खूप महत्व आहे आणि तो कोणताही खेळ असुदे. खेळ खेळल्यामुळे अनेक रोगापासून मुक्ती मिळते तसेच खेळामुळे आपल्याला सक्रीय बनवले जाते त्याचबरोबर खेळ खेळल्यामुळे होणारा मोठा फायदा म्हणजे शरीरामध्ये रक्त प्रवाह वाढतो म्हणजेच रक्ताभिसरण कमी होते तसेच खेळामुळे आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.

खेळ खेळल्यामुळे आपला चांगला व्यायाम होतो तसेच आपण शारीरिक दृष्ट्या मजबूत होते. आपण जर नियमित खेळ खेळले तर आपण सक्रीय बनतो तसेच आपली तग धरण्याची क्षमता आणि शक्ती वाढते. अश्या प्रकारे आपल्याला खेळामुळे प्रसिध्दी मिळू शकते तसेच खेळ खेळल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहू शकते.

आम्ही दिलेल्या essay on sports in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जीवनात खेळाचे महत्व निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my favourite sport in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of yoga in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये types of yoga information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!